खोतकरांना विधानसभा तर वैद्य किंवा त्रिवेदी यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याच्या सेनेत हालचाली

Foto
औरंगाबाद: विधान परिषद निवडणुकीच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. १९ ऑगस्ट रोजी या निवडणुकीकरिता मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार मानले जात असले, तरी त्यांना विधानसभा लढण्याकरिता सांगत विधान परिषदे करिता जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी व नगरसेवक राजू वैद्य यापैकी एकाला उमेदवारी देण्याच्या हालचाली सध्या सेनेत सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. 

निवडणूक आयोगाच्या वतीने औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था करिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १९ ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. यानंतर उमेदवार निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहेत. यात काँग्रेस कडून आमदार सुभाष झांबड तर शिवसेनेकडून पशुसंवर्धन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बालेकिल्ला मजबूत करण्याकरिता शिवसेना सरसावलेली असल्याने, शिवसेनेच्या गोटात खोतकर यांना विधानसभा लढण्याचे सांगत विधान परिषदे करिता औरंगाबादचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, व नगरसेवक राजू वैद्य या दोघांपैकी एकाला उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. यातील  वैद्य यांच्या बाबत विचार केल्यास  नेहमी विविध निवडणुकां करिता  उमेदवारीसाठी त्यांचे नाव चर्चेत असते  परंतु कायम त्यांना शेवटच्या क्षणी हुलकावणी मिळते यापूर्वी २००७-८ साली त्यांनी पदवीधर मतदार संघात निवडणूक लढविलेले असून, यात त्यांना १९ हजार मते मिळाली होती. दुसरीकडे वैद्य यांच्यापेक्षा मोठ्या पदावर जिल्हाप्रमुख असल्याने ते उजवे ठरतात. अर्थात लोकसभा निवडणुकीत ढासाळलेल्या बालेकिल्ल्यावरील पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याचे ठरल्यास वैद्य किंवा त्रिवेदी या दोघांपैकी एकाचा नावाचा विचार केला जाऊ शकतो. येत्या दोन दिवसात शिवसेनेच्या वतीने उमेदवार घोषित केला जाऊ शकतो अशी शक्यता देखील सूत्रांनी वर्तविली आहे. त्यामुळे कुणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker